आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर आहे. यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी केले.ते पंढरपूर येथे यात्रेनिमित्त एसटीने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक एसटी प्रशासनाला सुचना देताना ते म्हणाले.
” यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना यात्रा बसस्थानकावरील सोई-सुविधांची व्यवस्था करावी, बसेस चिखलात अडकून पडणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची पार्किंग करण्यात यावे. तसेच आपल्या एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ” याबरोबरच जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाची तसेच नैसर्गिक विधीची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना कुसेकर यांनी स्थानिक प्रशासनात दिल्या आहेत.
चार प्रमुख बसस्थानके
1 चंद्रभागा बसस्थान – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
2 भिमा यात्रा देगाव – छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश
3 विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
4 पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
