मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

गेले दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबई व उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून जोर धरला आहे. दरम्यान, मुंबईत गुरूवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ७.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र बुधवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला. शहरातील कुलाबा, परळ, वरळी, भायखळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या भागात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *