भयंकर! सर्दी- खोकल्यानंही तुमच्या मुलांना येऊ शकतं डिप्रेशन

स्पर्धेच्या युगात प्रत्येकाचा वैयक्तिक संघर्ष सुरु आहे. बदलती जीवनशैली आणि फास्टफुडचा विपरित परिणाम हा शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यावर ही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन ते चार वर्षांत मानसिक समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे  11 ते 16 वयोगटातील नैराश्याने ग्रासलेल्यांची संख्या जास्त आहे. फिनलँड विद्यापिठाने मांडलेल्या संशोधनानुसार लहान मुलांमध्ये डिप्रेशनची वाढ झपाट्याने होत आहे. जसं सर्दी आणि खोकल्याचं इन्फेक्शन पसरतं जातं, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये डिप्रेशन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मानसिक ताण तणाव वाढला की, त्याचा परिणाम शरीरावर देखील जाणवतो. वेळेत न जेवणं, जेवताना खाण्याकडे लक्ष न देणं यामुळे शरीराच्या वाढीसाठी हवे असलेले आवश्यक घटक अंगी लागत नाही. बऱ्याच जणांना तणावामध्ये असल्यावर जेवण जात नाही, त्यामुळे जरा काही खाल्लं तरी उलट्या होतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याचा परिणाम म्हणजे शरीराला  बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *