किमान दरात कमाल गैरसोयी? म्हाडाच्या घरांना गळती; बांधकामावर प्रश्नचिन्हं

मुंबईत  हक्काचं घर हवं अशी अनेकांचीच इच्छा असते. या हक्काच्या घरासाठी जीवाचा आटापिटा करून, पोटाला चिमटा काढून पैसे साठवले जातात. पण, घराचं स्वप्न मात्र साकार केलं जातं. अशा या स्वप्नपूर्तीमध्ये म्हाडा म्हणजे अनेकांचाच मोठा आधार. खिशाला परवडणाऱ्या आणि कुटुंबाला सामावून घेणाऱ्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध म्हाडापर्यंत येऊन थांबतो. सध्या मात्र याच स्वप्नांच्या घरांमध्ये अडचणी निर्माण Mhada Lottery मध्ये विजयी ठरलेल्या अनेकांनाच पावसाळ्यामध्ये घरातील भींतींमधून पाझरणाऱ्या पाण्यामुळं अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्वस्तात मस्त घरं मिळवून देणाऱ्या म्हाडाच्या घरांसंदर्भातील या वृत्तामुळं आता अनेक स्तरांतून या इमारतींच्या बांधकामावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. मुंबईच्या विक्रोळीतील कन्नमवार नगर इथं असणाऱ्या म्हाडाच्या घरांना गळती लागली आहे. त्यामुळं रहिवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसाच घरांना लागलेली गळती, इमारतीच्या बांधकामातील त्रुटी अशा समस्या समोर येऊ लागल्यामुळं सोडतीत विजयी झालेली मंडळी हैराण झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *