मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी शुक्रवार, २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून दुसरी गुणवत्ता यादी पाहता येईल.
यंदा पहिल्या गुणवत्ता यादीनुसार स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश पात्रता गुणांमध्ये कितपत फरक पडतो, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.