पाण्याच्या टँकरमधून पाणी येत नसल्याने वर चढून पाहिलं तर…; पुण्यातील खळबळजनक घटना

पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला आहे. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मृतदेहाची ओळख पटली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर टँकरमध्ये तिचा मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *