पालिका विद्यार्थ्यांना यंदा वेळेवर गणवेश

मागील वर्षी शालेय साहित्य आणि गणवेश वाटपात कोणताही घोटाळा अथवा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून महापालिकेने ई-रुपीच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शालेय गणवेश आणि साहित्य देण्यात येणार होते, परंतु अनेक त्रुटींमुळे नियोजन बारगळले होते. विद्यार्थ्यांना केवळ गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात आली होती. यंदा मात्र शाळा सुरू होताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, मोजे यासासारखे शालेय साहित्य, गणवेश देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *