इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंडच आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी पकडलं आहे. छाया वेतकोली आणि भारती वेतकोली असं या दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे.
छाया वेतकोली (24) आणि भारती वेतकोली (21) यांनीही चोरीचे दागिने आणि कपडे घालून ‘रील्स’ किंवा छोटे व्हिडिओ बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले, असे काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. घरातून दागिने, कपडे आणि रोख रकमेसह विदेशी चलन गहाळ झाल्याची तक्रार या दाम्पत्याने नुकतीच दिली होती.
वृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी
काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. पोलिसांना या वृद्ध जोडप्याकडून कळले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रिल्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती. दरम्यान, पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला.
रायगडशी थेट कनेक्शन
पोलिसांनी इनवेस्टिगेशन करताना इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकेशन ट्रेस केलं. त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं. तातडीने पोलिसांनी एक टीम येथे रवाना झाली. आणि दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आलं. चौकशी दरम्यान समजले की, दोघ्या सख्ख्या बहिणी आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 381 (कारकून किंवा नोकराकडून चोरी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
