विमान विक्रीच्या नावाखाली नेदरलॅन्डच्या कंपनीची साडे चार कोटींची फसवणूक, कंपनीच्या संचालकाला अटक

नेदरलॅन्ड येथील विमान कंपनीच्या मालकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वाहतूक कंपनीच्या एका संचालकाला बुधवारी अटक केली. सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ४२०, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४६१ आणि ३४ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *