मुंबईत १८८ इमारती धोकादायक ; सर्वाधिक धोकादायक इमारती मालाडमध्ये, इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्याचे आवाहन

मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून मुंबईत एकूण १८८ इमारती अतिधोकादायक स्थितीत उभ्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. तर शहर भागात २७ आणि पूर्व उपनगरातील ४७ इमारतींचा त्यात समावेश आहे. सर्वाधिक अतिधोकादायक इमारती मालाड परिसरात आहेत. पालिकेने या धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली असून इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *