महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू!

महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत असून त्यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. मात्र या मतदारसंघामध्ये मतदानाला जाताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश चीनकटे असं मृत्यू झालेल्या मतदाराचं नाव आहे. मतदान करायला जात असतानाच त्यांना मतदान केंद्राजवळ चक्कर आली आणि तिथेच ते खाली कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव काय?

मतदान केंद्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना मतरादाचा मृत्यू ओढावल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे. येथील किंजळोली दाभेकर कोंडमध्ये मतानाला निघालेल्या प्रकाश चीनकडे यांनी प्राण गमावले. प्रकाश यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *