पियूष गोयल यांचा आज उमेदवारी अर्ज

उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल हे मंगळवारी सकाळी बोरिवलीतील गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गोयल यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला असून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा घोळ सुरूच आहे. कोणी उमेदवार देता का उमेदवार, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातील प्रथेप्रमाणे गोयल यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बोरिवली ते कांदिवली अशा भव्य प्रचारफेरी आणि रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *