लोकलमधून पडून डोंंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही.

लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *