नाशिक हादरलं! मित्रासोबत झालेल्या भांडणाचा राग, आई-बहिण एकट्याच असताना त्याच्या घरी गेला आणि…

मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच धक्कादायक निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेलरोडवरील मोरे मळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात राहणाऱ्या मित्राच्या घराला त्याने आग लावली. यावेळी घरात मित्राची आई, दोन बहिणी आणि एक भाऊ होते.  आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे कुटुंब वाचलं. या प्रकरणी मित्राच्या आईने फिर्याद दिली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
नाशिक जिल्ह्यातील जेलरोडवरील मोरे मळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात निखिल आणि प्रथमेश हे दोन तरुण राहतात. काही कारणामुळे या दोघांमध्ये भांडण झालं होतं. प्रथमेशच्या आईने निखीलविरोधात पोलिसात गुन्हा दाखत केला. याचा राग निखिलच्या मनात होता. या रागातून शुक्रवारी रात्रीच्या वेळी निखिल प्रथमेशच्या घरी गेला. प्रथमेश काही कामानिमित्त मुंबईला  गेला होता. घरात प्रथमेशची आई, त्याच्या दोन बहिणी आणि एक भाऊ असे चारजण होते. हे चौघंही गाढ झोपेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *