अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या

अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या झाली आहे. नेरुळ परिसरात हत्येचा हा थरार घडला आहे. हल्लेखोरांच्या हल्ल्यात मृत गुंडाची प्तनी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे.

चिराग लोके असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.  चिराग महेश लोके (वय 30 वर्षे) हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहणारा आहे.  माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी चिराग लोके याची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात लोके याची पत्नी प्रियंका लोके (28) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

का केली हत्या?

या घटनेतील मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोके याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहुन नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपुर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पतत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता, या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करुन पलायन केले. यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली असून तीच्यावर नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकुण पाच मारेकऱयांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *