डोंबिवलीत क्रेन अंगावरुन गेल्याने पाळीव श्वानाचा चिरडून मृत्यू

 येथील शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम गृह संकुलाच्या आवारात एका पाळीव श्वानाच्या अंगावरुन क्रेन चालकाने बुधवारी संध्याकाळी क्रेन नेल्याने श्वानाचा जागीच चिरडून मृत्यू झाला. क्रेन चालका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात एका रहिवाशाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमएच ४६ एबी ०१५९ या क्रेन चालका विरुध्द पोलिसांनी रिजन्सी अनंतम मधील रहिवासी भूपेंद्र महाजन यांच्या तक्रारीवरुन प्राणी संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी संध्याकाळी रिजन्सी अनंतमधील आर. के. बाजार व्यापार केंद्राच्या बाहेरील रस्त्यावर संकुलातील पाळीव श्वान झोपला होता. उजेड आणि क्रेनचे दिवे सुरू असताना क्रेन चालकाला समोर कुत्रा झोपला आहे हे माहिती असुनही क्रेन चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे क्रेन चालवून झोपलेल्या श्वानाच्या अंगावर क्रेन नेली. श्वानाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *