मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास धमकावल्याचा आरोप

शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहा, नाही तर तुमची शिधापत्रिका रद्द करू, अशा धमक्या मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. असले प्रकार जनता खपवून घेणार नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा मोबाइलवर संदेश (एसएमएस) पाठविण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. शिंदे यांचा जळगावात कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गर्दी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना सभेला उपस्थित राहण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्याचे समोर आल्यावर पाटील यांनी टीका केली आहे.

आरोप चुकीचा-फडणवीस

जळगाव: प्रशासनाकडून लाभार्थ्यांसह शिक्षकांवर सक्ती करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *