अधिकारी सचिन सावंत यांना ईडीकडून अटक, लखनऊहून मुंबईला आणणार

महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. काल (२७ जून) एक दिवस विश्रांती घेऊन पावसाची आज पुन्हा संततधार सुरू झाली आहे. आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर रेल्वेसेवा विस्कळीत होते. गेल्या तीन दिवसांपासून रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सतत अडचणी येत असल्याने रेल्वेसेवा विस्कळीत होत आहे. काल (२७ जून) अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती. आज पुन्हा अंबरनाथ येथे प्रवाशांनी रेल्वे रोखल्याने मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना लेटलतीफचा फटका बसत आहे. दुसरीकडे पुण्यात काल (२७ जून) एका तरुणीवर भररस्त्यात कोयता हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *