बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हाय अलर्ट, रायगडला वादळाचा तडाखा तर तळकोकणात पेरणीला वेग

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईलाही हायअलर्ट देण्यात आलाय. मात्र वाऱ्यांची वाटचाल मंदावली असली तरी कोणताही धोका नको मुंबईत जुहू चौपाटीवरही पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  तसेच लाईफगार्डही तैनात करण्यात आले आहेत. हाय अलर्ट देण्यात आल्यानंतरही काही जण जुहू चौपाटीवर गेले होते. त्यात चौघे बुडाले तर दोघांना वाचवण्यात यश आलंय. त्यानंतर मग जुहू किनाऱ्यावर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतल्या मान्सूनपूर्व सरींमुळे बळीराजाला दिलासा मिळालाय. त्यामुळे शेतात मशागतीची कामं सुरू आहेत. दोन दिवस पडलेला मान्सूनपूर्व पाऊस पेरणीपूरक असल्यामुळे तळकोकणात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्यानं त्याची पुढची वाटचाल अत्यंत धीम्या गतीन होते आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भाला मात्र पावसासाठी आणखी वाट पाहावी

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे पोहोचले तरी कोकणात या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांचा फटका बसतोय. रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वादळी वारे वाहातायत. श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. वाळवटी गावात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांची छपरं उडाली.

125 ते 135 किमी वेगाने वारे

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या द्वारकामधल्या समुद्राला उधाण आलंय. ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वारे वाहतायत. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. चक्रीवादळाचा किती फटका द्वारकाला बसू शकतो. अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चाललंय. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून 15 जूनला गुजरातच्या सागरी भागासह पाकिस्तानच्या कराची शहरात वेगाने धडकेल. यावेळी वा-यांचा वेग 145 ते 150 किमी पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी, जुनागड भागात उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा इशारा आहे.

 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.. कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये 10 किमीच्या परिसरातली गावं खाली करण्यात आली आहेत. कच्छमध्ये कलम 144 लावण्यात आलंय. तीन दिवसांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आलीयत.. चक्रीवादळामुळे दीडशे किमी प्रतीतास वेगाने वारे वाहणार आहेत. तर 14 ते 16 जूनदरम्यान अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारही अलर्ट मोडवर आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या 12 टीम्स तैनात आहेत. कच्छ, पोरबंदर, जामनगर, द्वारका, गिर सोमनाथ, मोरबी आणि राजकोटमध्ये या टीम्स तैनात केल्यायत. तर केंद्राच्या तीन टीम्स राखीव ठेवण्यात आल्यायत.. भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये इमरजन्सी कंट्रोल रूम तयार करण्यात आल्यायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *