जुहू चौपाटीजवळ समुद्रात ६ जण बुडाले, २ जणांचा वाचवण्यात यश; ४ जण बेपत्ता

अरबी समुद्रात घोंघावत असलेले बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप घेतलं आहे. गुजरातमधील सौराष्ट्र कच्छ किनारपट्टीवर हवामान विभागाने ऑरेंज इशारा दिला आहे. याचा परिणाम कोकण आणि मुंबईतील किनारपट्टीवर दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर किनारपट्टीजवळ एनडीआरफच्या टीम तैनात करण्यात असून, समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. अशात जुहू चौपाटीजवळील समुद्रात ६ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जुहू चौपाटीजवळ समुद्रात ६ जण बुडाले आहेत. यात २ जणांना स्थानिकांनी वाचवलं आहे. तर, ४ जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिसोमवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *