प्रेयसीवर बलात्कार करुन गुप्तांगात टाकली मिरची पावडर, नंतर केबल वायर…; मन सुन्न करणारी घटना

आपल्याच प्रेयसीवर तरुणीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कार आणि शारिरीक अत्याचार  केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तरुणीच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकत कौर्याची परिसीमा गाठली आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर सतत तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

निकुंज कुमार अमरित भाई पटेल असं आरोपीचं नाव आहे. निकुंज हा विवाहित होता. तसंच त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी दुसऱ्या गावात राहत होती. आपण विवाहित आहोत ही माहिती त्याने आपल्या प्रेयसीपासून लपवली होती. आपण अविवाहित असल्याचं सांगत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

पण काही दिवसांनी प्रेयसीला त्याचं सत्य समजलं. यानंतर दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. तरुणीने यानंतर निकुंजपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने निकुंज संतापला होता. या संतापात त्याने केबल वायरने प्रेयसीला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकली. यानंतर त्याने तरुणीला जर तिने या घटनेची वाच्यता केली तर तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली.

 तरुणी गंभीर जखमी असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *