परिचारिका भरतीच्या नावाने उमेदवारांकडून पैशांची मागणी, मालेगाव महापालिकेतील प्रकार

मालेगाव महापालिकेतर्फे सुरू असलेल्या परिचारिका भरती प्रक्रियेत अंतिम निवड करण्याची हमी देत अज्ञात व्यक्तींकडून संबंधित उमेदवारांशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून पैसे लाटण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी संबधित उमेदवारांना सजग करत त्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. ही भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेतर्फे परिचारिकांची २० पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ३० जून २०२२ रोजी जाहिरात देण्यात आली होती. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवण्यात आल्या. नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांकडून या हरकतींवर निपटारा करण्यात आला. त्यानंतर पात्र यादीतील उमेदवारांना गुणवत्तेनुसार १:५ या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *