मुक्या प्राण्यांवर दया करा अशी शिकवण दिली जाते. मीरारोडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका श्वानाला अत्यंत क्रूर वागणूक देण्यात आली आहे. रस्त्यावर भुंकला म्हणून त्याला जमिनीवर आपटण्यात आले. श्वानावर अत्याचार करतानाचा सर्व प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्या कैद झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोडच्या कणकीय परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका रस्त्यावरील श्वानाला तीन जणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उपचारा दरम्यान या श्वानाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्राणी प्रेमींनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर मीरारोड पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात प्राण्यांच्या क्रूर वागणूक व छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
