मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, राजभवनात इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे सातारा दौऱ्यावर निघत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर राजभवन येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे हे सातारा येथे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जात होते. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

मुंबईतील राजभवन येथून एकनाथ शिंदे सातारा येथे कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले, मात्र बिघाड झाल्याचे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर त्यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *