भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला अन्… सांगलीतल्या तरुणाचे धक्कादायक कृत्य

सांगलीच्या जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जत तालुक्यातील येळवी येथे एका तरुणाने स्वतःलाच श्रद्धांजली वाहत जीवनयात्रा संपवली आहे. श्रद्धांजलीचे स्टेटस या तरुणाने सोशल मीडियावर स्टेटला ठेवत आत्महत्या केली आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे सगळ्या गावात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अशाच प्रकारे आत्महत्या झाल्याने चिंतेचा विषय बनला आहे.

औदुंबर विजय जगताप असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. औदुंबरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी औदुंबरने आपल्या स्वतःच्याच फोटोला श्रद्धांजलीची पोस्ट लिहून ती सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवली होती. त्यानंतर औदुंबरने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान औदुंबरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *