कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झालीय. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या उदय सामंत यांच्याविरोधात उमेदवारासाठी आतापासून शोध सुरु झालाय. रत्नागिरी-संगमेश्वर या उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजापूर-लांजा या ठिकाणचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, पक्षानं आदेश दिल्यास रत्नागिरीमधून देखील लढेन, अशी प्रतिक्रिया गुहागरचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिलीय. त्यामुळे आता उदय सामंतांविरोधात राजन साळवी लढणार की भास्कर जाधव अशी चर्चा सुरू झालीय.
