‘स्टोरी टेल’वर ‘एप्रिल पुल’; ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात ऐकण्याची संधी

गेल्या काही वर्षांत पुस्तके वाचण्याबरोबरच कथा ऐकण्याकडेही नागरिकांचा कल वाढत आहे. वाचकांना अधिकाधिक साहित्य ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्टोरी टेल मराठी’ने एप्रिल महिन्यात ‘पुल’च्या निवडक कथा ऑडिओ बुक स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्टोरी टेल मराठी’वर ‘एप्रिल पुल’ या नावाने एप्रिल महिन्यात दर आठवड्याला ‘पुल’चे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात ‘ऑडिओ बुक’ स्वरुपात उपलब्ध करण्यात येणार आहे. याची सुरुवात १ एप्रिल रोजी ‘पुल’च्या ‘गुण गाईन आवडी’मधील काही लेखांपासून होणार आहे. तर
४ एप्रिल रोजी ‘मैत्र’ हे ऑडिओ बुक प्रकशित होणार आहे. या कथा कोणाच्या आवाजात ऐकता येतील याची माहितीही दरवेळी ‘स्टोरी टेल’वर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *