विक्रीस मनाई असलेला सुगंधित तंबाखू व गुटका विकणाऱ्या साठेबाजाचे धाबे धाड पडल्याने दणाणले आहे. स्थानिक बढे चौकातील प्रिया ट्रेडिंग व मोहता मार्केटमधील दोन दुकानांवर गुन्हे शाखेने धाड टाकून विविध कंपनीचा असा माल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई चालली.तीनही ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या तंबाखू v गुटख्याची एकूण किंमत वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चमू गठित केली होती. अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात शहरात येत असून शालेय विद्यार्थी त्यास बळी पडत असल्याचे चिंताजनक चित्र आहे.
“कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने 17 मार्च रोजी 159 महापालिका कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले होते. या बदलीच्या आदेशामधील 8 कर्मचारी सेवानिवृत्त 2 कर्मचारी मयत झालेले आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही त्याचवेळी आदेश बदलले आहेत. पण कुठल्याही प्रकारचे आदेश बदलल्याचे दिसून आलेले नाही. जुन्या आदेशाप्रमाणेच कर्मचारी रुजू झाले आहेत,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश काटे यांनी केला आहे.
आदेश काढल्यानंतर लक्षात आली चूक
“17 मार्च रोजी मी जे बदल्यांचे आदेश काढल्यानंतर चूक आमच्या लक्षात आली. त्यानंतर त्याच दिवशी ते आदेश रद्द करुन नवीन बदल्याचे आदेश काढण्यात आले. ज्या बदल्या होणार आहेत त्या नवीन आदेशानुसार होणार आहेत. जुने आदेश आम्ही लागू केले नव्हते,” असे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.
