डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात

डोंबिवली एमआयडीसीत मध्यरात्री दोन कंपन्यांना आग लागली. संपूर्ण रात्र हे अग्नितांडव सुरु होते. एमआयडीसी फेज 1 भागात रात्री 1 वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. खंबाळपाडा भागानजीक असलेल्या एमआयडीसीत रामसन्स आणि प्राज या दोन कंपन्या आगीत जळून भस्मसात झाल्या. आधी प्राज या कंपनीत आग लागली. ती आग पसरत शेजारच्या रामसन्सलाही लागली. दोन्ही कंपन्यांत मोठमोठाले स्फोट होत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. यातील एक कंपनी परफ्यूम तयार करते तर दुस-या कंपनीत कापड तयार होते. ही आग एवढी मोठी होती की डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे इथल्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागलेल्या ठिकाणाच्या अगदी शेजारी सीएनजी पंप होता. त्यामुळे आगीच्या ज्वाला पंपापर्यंत पोहोचू न देण्यासाठी आटापिटा सुरू होता. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *