मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे नेमकं काय असतं ते दोखवून देणारा धक्कादायक प्रकार मीरारोड (Miraroad) परीसरात घडला आहे. रुग्णवाहिकेतून मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांची चोरी झाली आहे. यामुळे महिलेच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे (Crime news).
मीरारोडच्या कनक्किया परिसरात राहणाऱ्या रहीम मौला शेख यांच्या आईचा घरातच दीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. त्यांनी भाईंदर येथील लाईफ केअर रुग्णालयातील डॉक्टरांना याची माहिती देऊन डॉक्टरांना घरी बोलावले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मात्र, तरी देखील पुढील तपासणीसाठी शेख यांच्या आईला रुग्णवाहिकेने भाईंदर पूर्वेच्या लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात येत होते. यावेळी रुग्णवाहिकेतील एका कर्मचाऱ्याने शेख यांच्या मृत आईच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरल्या. यांनचर त्यांनी या बांगड्या विरार मधील एका सोनाराकडे गहाण ठेवून पैसे घेतले होते.
