कर्ज फेड अन्यथा वेश्या व्यवसाय करायला लावू अन्…, कोल्हापुरातील संतापजनक घटना

कोल्हापुरातून (Kolhapur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाची परतफेड करत नसल्याने सावकर गुंडांच्या माध्यमातून कुटुंबाला मारहाण करत धमकावत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आली आहे. इतकंच नाही, तर सावकाराने कर्जाची परतफेड न केल्यास त्यांच्या कुटुंबातील महिलांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडू असंही धमकावलं आहे. दरम्यान पोलीस तक्रार करुनही घटनेची दखल घेत नसल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.

नेमका प्रकार काय?

कोल्हापूरच्या वडगणे गावातील एका कुटुंबाला सावकाराकडून दमदाटी आणि मारहाण होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार सुरु आहे. कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसायाला लावू अशी धमकी सावकाराने कुटुंबाला दिली आहे. कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र पोलीस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.

सावकार कर्जाची वसुली करण्यासाठी कुटुंबाच्या घरी गुंड पाठवत आहे. हे गुंड कुटुंबाला मारहाण करत आहेत. तसंच घऱातील साहित्य घराबाहेर फेकून देत लवकर घर सोडा अशी धमकी देत आहेत. सावकाराने कुटुंबाची कारही ताब्यात घेतली आहे. माझे पैसे द्या, अन्यथा महिलांना वेश्या व्यवसाय करायला लावू अशी धमकी सावकाराकडून कुटुंबाला दिली जात आहे.

कुटुंबाने घर बांधण्यासाठी सावकाराकडून 25 लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र आता सावकार 25 लाखांच्या कर्जासाठी 80 लाखाची वसुली करत असल्याचा कुटुंबाचा दावा आहे. गावात सुरु असल्याने या प्रकारामुळे दहशत माजली असून इतर कुटुंबही भीतीच्या सावटात आहेत. दरम्यान पोलीस दखल घेत नसल्याने कुटुंब आता पोलीस अधिक्षकांकडे दाद मागण्याच्या तयारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *