सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला मानखुर्द पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. याप्रकारणी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी आरोपीच्या इमारतीत राहते. मुलगी घराबाहेर असताना आरोपीने तिला उचलून घरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी रडायला लागली. त्यामुळे घाबरून आरोपीने तिला घराबाहेर सोडले. त्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानुसार त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला रविवारी रात्री उशिरा अटक केली. घटना घडली, त्यावेळी आरोपीची आई व भाऊ रुग्णालयात गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *