जीवे मारून समुद्रात फेकू…’ आशिष शेलार यांना धमकीचं पत्र

भाजप (BJP) नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निवावी पत्राद्वारे शेलार यांना ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मारून समुद्रात फेकू असा मजकूर या पत्रात आहे.

काय आहे त्या पत्रात?
या पत्रात आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाच्यावतीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आहे. हे हस्ताक्षर कोणाचं आहे, कोणत्या पोस्टऑफिसमधून हे पत्र आलं आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *