राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची 30 जानेवारी 2023 रोजी होणारी लॉ ची परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, Maharashtra Public Service Commission (MPSC) माध्यामातून बंपर भरती होणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 8 हजार 169 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.
ही पूर्वपरिक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे. यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 2 सप्टेंबर रोजी vतर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.

