पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सुनावली. जोसेफ अँथोनी देवनेसन (वय ४०, रा. दापोडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने १६ वर्षीय मुलाचा विनयभंग केला होता. याबाबत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. १८ एप्रिल २०१९ रोजी दापोडी परिसरात ही घडली होती.

मुलगी एका दुकानात खरेदीसाठी गेली होती. तेव्हा देवनेसन याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करून टाकीन, तू कोठे चेहरा दाखविण्याच्या लायक राहणार नाही, अशी धमकी दिली होती. त्याने मुलीचा दोन ते तीन वेळा पाठलाग केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *