मुंबईकरांचं श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर सिध्दिविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तीचे दर्शन 14 तारखेपासून पाच दिवसांसाठी बंद राहणारंय. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे येत्या 14 ते 18 डिसेंबर दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
19 तारखेला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्यातून दर्शन घेता येईल, असं सांगण्यात आलं आहे.
