आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाबाबत शिंदेंनी केला भर सभेत गौप्यस्फोट

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यामध्ये एकास एक तोडीची भाषणे दोन्ही गटातील नेत्यांनी केलीत. शिंदे गटातील शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला इतकंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींवरही जहरी शब्दांमध्ये टीका केली. दुसरीकडे ठाकरे गटातील सुषमा अंधारेंनी त्यांच्या भाषणामधून बंडखोर आमदारांची ‘पिसे’ काढलीत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

उद्धव ठाकरेंनी विचारलेल्या आनंद दिघेंच्या ‘त्या’ प्रश्नाबाबत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट 
आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर मी उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा ते सांत्वन करतील असं वाटलं. दिघे साहेबांनी पक्ष कसा वाढवला?, संघटना कशी वाढवली, आता ठाणे जिल्ह्यात काय करावं लागेल हे विचारतील असं वाटलं होतं. त्यावेळी आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, किती आहे आणि कोणाच्या नावावर आहे? असं उद्धव ठाकरेंनी विचारल्याचा गौप्यस्फोट शिंदेंनी केला.

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो त्यांनी हे विचारल्यावर मला धक्का बसला होता. मी कधी खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानूभूती मिळवणारा हा एकनाथ शिंदे नाही, असंही म्हणत शिंदेनी निशाणा साधला आहे. यावर आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *