शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये मोठी चोरी?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या आलिशान घर असलेल्या मन्नतची सध्या बरीच चर्चा आहे. सुपरस्टार शाहरुखप्रमाणेच त्याचं आलिशान घर देखील खूप छान आहे.  शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर हजारो चाहते फक्त एका फोटोसाठी जमतात. चाहत्यांसाठी मन्नत घर टुरिस्ट पॉइंट झाला आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.  मात्र आाता शाहरुखचा बंगला मन्नतबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्याच्या घराच्या गेटवर लावलेली२५ लाख रुपयांची नेम प्लेट गायब झाली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील बादशाह शाहरुख खानचा आलिशान बंगला मुंबईतील बँन्ड्रा बेंड स्टँडवर आहे. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी मन्नतच्या घराबाहेर चाहते नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशा परिस्थितीत अलीकडेच शाहरुखच्या बंगल्याबाहेरची मन्नत नावाची नेमप्लेट गायब झाल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं आहे.

मग काय सोशल मीडियावर सगळीकडे एकच चर्चा रंगू लागली आहे की, शाहरुखच्या बंगल्याची नेम प्लेट काढावी लागली याचं कारण काय असावं? काही दिवसांपूर्वी मन्नतवर २५ लाख रुपयांची नवीन नेम प्लेट लावण्यात आली होती.

मन्नतच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, शाहरुख खानच्या घरातून अचानक गायब झालेल्या नेम प्लेटचं सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे काही काळासाठी नेम प्लेट काढून टाकण्यात आली आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर मन्नतच्या नेमप्लेट गायब झाल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक ट्विटर यूजर्स असंही म्हणत आहेत की, कदाचित मन्नतची नेम प्लेट चोरीला गेली असावी. मात्र, या प्रकरणात कितपत तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल. सध्या शाहरुख त्याचा पुढचा चित्रपट पठाणमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *