गोरेगावमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे.
25 मे रोजी एका ओला कॅब चालकाला मुंबईतील गोरेगाव येथून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आणि तिच्याशी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुरारी कुमार सिंह (29) असे आरोपीचे नाव असून तो गोरेगाव येथे राहतो. पोलीस निरीक्षक सचिन पांचाळ यांनी सांगितले की, तो मूळचा बिहारचा आहे. त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे आहेत का याही आम्ही शोधत आहोत. त्याची अधिक माहिती घेण्यात येत आहे.
