भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ( 1993 Mumbai serial blasts case) सहभागी असलेल्या अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे.
1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट
मुंबईत 1993 मध्ये मोठे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या साखळी बॉम्बस्फोटात हात असलेल्या अबू बकर या भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून अधिक माहिती मिळू शकणार आहे.
या स्फोटात मुंबईत अनेक ठिकाणी एकूण 12 बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे 257 लोकांचा मृत्यू झाला असून 713 लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आता अटक करण्यात आलेल्या दहशतवादी अबू बकरला यूएईमधून भारतात आणण्यात येणार आहे.
