राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. मुंबईतही या वेळेस चांगलीच थंडी जाणवतेय. सर्वांनाच हुडहुडी भरलीये. त्यात आता काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 2 ते 4 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती पाहायला मिळतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *