मृत्यू समोर दिसत असतानाही सोडली नाही पतीची साथ…

बदलापूर पाईप रोडवर गंधकानं भरलेल्या पेटत्या ट्रकच्या धडकेत रिक्षा जळून खाक झाल्याची घटना बुधवारी अंबरनाथमध्ये घडली होती. या घटनेत रिक्षेतील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही रिक्षा आग विझवल्यानंतर बाहेर काढण्यात आली, त्यावेळी वासुदेव आणि गुलाबबाई यांचे मृतदेह एकमेकांना कवटाळून बसलेल्या अवस्थेत बाहेर काढले गेले. मृतदेह वेगळे होत नसल्यानं ते तशाच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजात मात्र मोठी कालवाकालव झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *