मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका, परमबीर सिंह यांच्या वकिलांचा कोर्टात दावा

मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका असल्याचं परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. परमबीर सिंग यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे. परमबीर सिंह हे देशातच आहेत, अशी माहिती त्यांचे वकिल पुनीतल बाली यांनी दिली आहे.

परमवीर सिंह यांच्या वकिलांनी सांगितले की, ते देश सोडून बाहेर गेले नाहीत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे भारतातच आहेत. मात्र जीवाला धोका असल्यामुळे ते लपल्याच त्यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

परमवीर सिंह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याबाबत माहिती दिली. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह हे देशातच आहेत. ते फरार झालेले नाहीत. ते भारतात अज्ञात स्थळी आहेत. परमबीर सिंह यांनी महाराष्ट्रात येताच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. परमबीर सिंह यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे देशातच आहेत असा दावा त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला. मुंबई पोलिसांपासून जिवाला धोका असल्यामुळे ते सध्या लपून बसले आहेत, ते फरार झालेले नाहीत असं त्यांच्या वकिलाने कोर्टात सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *