अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भाजप बंदच्या  पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे.  आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. राजकमल चौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून जमावाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला असून यावेळी तोडफोड आणि दगडफेकीचा प्रकार घडला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमाल्याने पोलिसांना पाचारण कऱण्यात आली आहे. दरम्यान, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. अमरावतीच्या जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी, असे आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठा जमाव जमा झाला आहे. राजकमल चौकात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी सुरु केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अमरावाती भाजपच्या बंदला सुरुवात झाली असून बंदसाठी SRPF च्या दोन तुकड्या तर 400 पोलीस तैनात करण्यात आले आहे. काल भाजपने  बंदची हाक दिली होती. साडेनऊ वाजता शहरातील राजकमल चौकात भाजपचे कार्यकर्ते जमल्यानंतर मोठा जमाव झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *