राज्यात विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आज वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले अजून यातील 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. अमरावतीच्या गाळेगाव येथील धक्कादायक घटना आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून 8 जणांचा शोध घेण्यात येत आहे. बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बुडालेले सर्वजण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते अशी माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बेनोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु केला आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जोरदार पाऊस असल्याने अद्याप आठ जणांचा शोध लागलेला नाही.
