मुंबईतून धक्कादायक बातमी, नजरचूक बेतली मुलीच्या जीवावर

धक्कादायक बातमी मुंबईतल्या धारावीतून. नजरचुकीने विषारी पेस्ट वापरल्यानं मुलीचा मृत्यू झाला. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश केल्याने एका मुलीचा मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर ही मुलगी ब्रश करण्यासाठी गेली. ओट्यावर टूथपेस्टशेजारीच उंदीर मारण्याची पेस्ट ठेवली होती. मुलीने नजरचुकीनं टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि त्यानं ब्रश केले. मुलीला ब्रश करताना पेस्टची चव वेगळीच लागली. तोपर्यंत उशीर झाला होता.

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी तिने तत्काळ तोंड धुतले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उंदीर मारायचे विष शरीरात सर्वत्र पसरले होते. ती आजारी पडली. उपचारासाठी तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही काळानंतर, तिच्या पोटदुखायला लागली. तिने पोटदुखीची तक्रार केली, त्यानंतर तिच्या आईने तिला धारावीच्या एका रुग्णालयात नेले आणि तिथे औषधोपचार करण्यात आले. मात्र, पोटदुखी कायम सुरु होती. तीन दिवस पोटदुखीची तक्रार करत राहिल्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेतले आणि तिची चौकशी केली. तेव्हा तिने तिला सांगितले की तिने चुकून टूथपेस्टसाठी उंदीर विषाची पेस्ट वापरली, अशी माहिती एका पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *