पेट्रोलट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळं आधीच महागाईचा भडका उडाला आहे. त्यात दैनंदिन वापरातल्या ग्राहकोपयोगी वस्तूंचेही भाव वाढले आहेत.
घरातल्या दैनंदिन वापराच्या वस्तू देखील महाग झाल्यात. अगदी आंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर आणि वडी देखील. त्यामुळं नहाना-धोना अगदी मुश्कील होऊन गेलंय.
हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीनं गेल्या महिनाभरात अंघोळीचा साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीत तब्बल 3 ते 14 टक्के वाढ केली आहे. कच्चा मालाच्या किंमती वाढल्यानं उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची वेळ आल्याचं कंपनीचं म्हणणंय.
