बोईसर MIDC कंपनीत मोठी आग लागली आहे. जखारीया कंपनीत स्फोटानंतर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीच्या दुर्घटनेत एक ठार तर चारजण भाजल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोईसर येथील जाखरीया फॅब्रिक लिमिटेड येथे आगीच्या स्फोटामुळे Boisar MIDC परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमकच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
