मुंबईच्या स्पेशल कोर्टाच्या पोक्सो ऍक्ट अंतर्गत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षांच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला पॉर्न दाखवून मास्टरबेट केल्याचा आरोपांतर्गंत 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2016 रोजी शिक्षकाने विद्यार्थ्याला अश्लील कंटेट दाखवला होता. त्यावेळी त्या विद्यार्थीनीचं वय 5 वर्षे होतं. त्या मुलीचा काका तिला सायंकाळी 5.30 वाजता अरबी शिकण्यासाठी शिक्षकाकडे सोडून गेला.
संध्याकाळी मुलीला घेऊन तिचे वडील घरी गेले. घरी गेल्यावर आईने विचारलं तुला आज काय शिकवलं?. तेव्हा मुलीने जे सांगितलं ते ऐकून आईला धक्काच बसला. मुलीने आईला सांगितलं की, शिक्षकाने तिला अश्लील फोटो दाखवले आणि त्यांनी काही तरी केलं.
यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली. आणि शिक्षकाचा फोन जप्त केला. चार्जशीट दाखल झाल्यानंतर शिक्षकाने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. विद्यार्थिनीचे पालक फी भरत नसल्यामुळे मला फसवण्याचा कट करत आहेत, असा आरोपही केला.
मुलीने न्यायालयात सांगितले की घटनेच्या वेळी दुसरा विद्यार्थी तिच्या बेंचसमोर बसला होता. आरोपीने त्याला चुकीचे करण्यास सांगितले होते. विशेष सरकारी वकील शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, मुलीला दाखवलेला व्हिडओ आणि फोटो अश्लील आहेत. मुलीचे पालक त्याला का फसवतील याचे आरोपीने वैध कारण दिलेले नाही. ते केवळ फीसाठी हे करणार नाहीत.