मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वात लहान असलेला तुळशी तलाव शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास भरून वाहू लागला. गेल्या वर्षी हा तलाव २७ जुलै रोजी भरून वाहू लागला होता

तुळशी तलावाची जलधारण क्षमता ८,०४६ दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लिटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. २०१९ मध्ये हा तलाव १२ जुलै, २०१८ मध्‍ये ९ जुलै रोजी आणि २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किमी असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लिटर एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी विहार तलावात जाऊन मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *